अंजली राऊत
चिकन आणि मटण खायला आवडते, बहुतेकदा घरी शिजवले गेलेले हे अन्न वाया जाऊ नये म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवले जाते.
रेफ्रिजरेटरमध्ये अन्न साठवण्यासाठी वेळेची मर्यादा असते. फळे आणि भाज्यांप्रमाणेच चिकन, मासे आणि मटणालाही वेळेची मर्यादा असते. ते जास्त काळ साठवल्याने त्यांच्या पौष्टिक मूल्यांवर तसेच त्यांच्या चवीवरही परिणाम होतो.
कच्चे चिकन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे असेल तर ते एक किंवा दोन दिवसात वापरावे लागेल. तथापि चिकन घट्ट बंद पॅकेजमध्ये फ्रीजरमध्ये आठवडाभर साठवता येते.
चिकनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते लवकर खराब होते. जर चिकनला विचित्र वास येत असेल किंवा हलका राखाडी रंग दिसत असेल तर याचा अर्थ ते खराब होत आहे.
तापमानातील बदलांनुसार मासे देखील लवकर खराब होतात. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तरी बर्फाने भरलेल्या भांड्यात ठेवावे. मासे खराब झाल्यास त्याला तीव्र वास येतो
मटण रेफ्रिजरेटरमध्ये तीन ते पाच दिवस साठवता येते. लक्षात ठेवा मटण शक्यतो घट्ट बंद पॅकेजमध्ये बंद करावे. मटण सील करून रेफ्रिजरेटरमध्ये सहजपणे साठवता येते. जेव्हा मटण खराब होते तेव्हा त्यामध्ये चिकट पोत तयार होऊल मटणाचा रंग बदलू लागतो.