पुढारी वृत्तसेवा
धार्मिक स्थळ असो की घर धार्मिक उत्सवांत कापूर लावून आरती केली जाते.
आपल्या धार्मिक उत्सवासह औषधी गुणधर्म असणारा कापूर कसा तयार होतो, हे तुम्हाला माहित आहे का?
देवघरातील पवित्र कापूर झाडापासून तयार होतो.
कापराचे झाड आपल्याकडील आंब्याच्या झाडाच्या आकारा एवढे होते.
या झाडाचे शास्त्रीय नाव ‘सिनामोमम कॅम्फोरा’ असे आहे.
विशेष म्हणजे हे झाड परिसरातील हवेचे शुद्धीकरण करते.
कापूरच्या झाडाच्या लाकूड, फांद्या आणि पानांमध्ये असलेल्या सुगंधी तेलाचे ऊर्ध्वपातन करून त्यातून नैसर्गिक कापूर मिळवला जातो.
कापूरच्या झाडाचे लाकूड आणि पाने वाफवून त्यातून मिळणाऱ्या अर्कापासून नैसर्गिक कापूर तयार केला जातो. या कापूरचे शुद्धीकरण केल्यानंतर शुद्ध कापूर मिळतो.
भीमसेनी कापूर हा १००% शुद्ध आणि नैसर्गिक असतो. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
भीमसेनी कापूर आणि साधा कापूर झाडापासूनच तयार केला जातो. दोन्ही नैसर्गिकरीत्या तयार केलेले असतात.
आयुर्वेदात शुद्ध कापूरचा वापर अनेक रोगांवर औषध म्हणून केला जातो.