पुढारी वृत्तसेवा
मेटाबॉलिझम वाढवते
आले शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढवते. त्यामुळे कॅलरी जलद बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारते
चांगले पचन म्हणजे कमी फॅट साठा. आले पचनसंस्था मजबूत करते आणि अन्न नीट पचायला मदत करते.
चरबी वितळण्यास मदत
आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करतात.
भूक कमी करते
नियमित आल्याचे सेवन केल्याने अनावश्यक भूक कमी होते आणि ओव्हरईटिंग टाळले जाते.
सूज (Inflammation) कमी करते
वजन वाढण्यामागे शरीरातील सूज हेही कारण असते. आले ही सूज कमी करण्यास मदत करते.
ब्लोटिंग कमी करते
पोट फुगणे, गॅस, अॅसिडिटी कमी झाल्यामुळे पोट सपाट दिसण्यास मदत होते.
डिटॉक्स इफेक्ट
आले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
हार्मोनल बॅलन्स सुधारते
विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढते, आले ते संतुलित ठेवायला मदत करते.
एनर्जी वाढवते
थकवा कमी होतो, अॅक्टिव्हनेस वाढतो आणि एक्सरसाईज करण्याची क्षमता सुधारते.