पुढारी वृत्तसेवा
राहुल गांधींकडे किती पदव्या आहेत?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून घ्या.
दिल्लीत झाली शालेय शिक्षणाची सुरुवात
राहुल गांधी यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमध्ये घेतले.
द दून स्कूलमध्येही शिक्षण
यानंतर त्यांनी देहरादूनमधील प्रतिष्ठित द दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर बदल
1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षा कारणांमुळे काही काळ घरूनच शिक्षण सुरू ठेवावे लागले.
सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश
1989 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण
उच्च शिक्षणासाठी राहुल गांधी अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात गेले.
राजीव गांधींच्या हत्येनंतर बदल
1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षा कारणांमुळे हार्वर्डमधील शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
रॉलिन्स कॉलेजमधून पदवी
1994 मध्ये अमेरिकेतील रॉलिन्स कॉलेजमधून त्यांनी Bachelor of Arts पदवी पूर्ण केली.
केंब्रिज विद्यापीठातून M.Phil
यानंतर ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून Development Studies मध्ये M.Phil पदवी मिळवली.
शिक्षणामुळे वेगळी ओळख
देश-विदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे राहुल गांधी यांना भारतीय राजकारणातील सुशिक्षित नेत्यांमध्ये गणले जाते.