Hard vs Soft Belly Fat: पोटावरची चरबी 'कडक' आहे की 'मऊ'? कोणती जास्त धोकादायक!

पुढारी वृत्तसेवा

'बेली फॅट' म्हणजेच पोटावर चरबी जमा होणे आजकाल सामान्य समस्या बनली आहे.

पोटाला हलका दाब दिल्‍यानंतर चरबी मऊ किंवा कडक वाटू शकते.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे 'सॉफ्ट बेली' आणि 'हार्ड बेली'मधील फरक आणि धोके स्पष्ट केले आहेत.

डॉ. शुभम यांच्या मते, 'सॉफ्ट बेली' ही 'सबक्युटेनियस फॅट' असते, ती सहजपणे बोटाच्‍या चिमटीत पकडता येते. याचा चयापचयावर फारसा वाईट परिणाम होत नाही.

'सॉफ्ट बेली' 'हार्ड बेली'च्या तुलनेत कमी धोकादायक मानले जाते.

पोट स्पर्श केल्यावर दगडासारखे कडक जाणवत असेल, तर 'हार्ड बेली फॅट' असू शकते.

'हार्ड बेली रबी दाहक रसायने आणि स्ट्रेस हार्मोन्स उत्सर्जित करते. यामुळे फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेझिस्टन्स, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

डॉ. शुभम वात्स्य यांच्या मते, केवळ वजन किंवा बीएमआय (BMI) बघून आरोग्याचा अचूक अंदाज लावता येत नाही.

अनेक लोकांच्‍या पोटात 'व्हिसरल फॅट' मोठ्या प्रमाणात असू शकते. म्हणूनच वरून फिट दिसणाऱ्या व्यक्तींनाही फॅटी लिव्हर, हाय बीपी किंवा हृदयविकार होऊ शकतात.

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहारातील बदलासह व्यायाम आवश्‍यक आहे.

तणावमुक्‍त जीवनशैली अंगीकारुन पुरेशी झोप: ७-८ तासांची शांत झोप आवश्‍यक आहे.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.