Spoiled Milk Side Effects | दुधाला दुर्गंधी येतेय? सावधान, शरीरावर होऊ शकतात 'हे' भयंकर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

बॅक्टेरियाची वाढ: दूध खराब झाल्यावर त्यामध्ये ई-कोलाई (E. coli), साल्मोनेला (Salmonella) आणि लिस्टेरिया यांसारखे घातक बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात.

Yak Milk Health Benefits | Pudhari

फूड पॉयझनिंग: खराब दूध पिण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे अन्नबाधा (Food Poisoning), ज्यामुळे शरीर पूर्णपणे गळून जाऊ शकते.

Digestive power

पोटाच्या समस्या: नासलेले दूध पिल्याने पोटात कळा येणे, तीव्र पोटदुखी आणि गॅसचा त्रास उद्भवू शकतो.

canva photo

उलट्या आणि जुलाब: शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी शरीर उलट्या आणि जुलाबाचा आधार घेते, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

तीव्र ताप: संसर्गामुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि थंडी वाजून ताप येण्याची शक्यता असते.

Fever & tastes

पचनसंस्थेवर परिणाम: खराब दुधामुळे पचनसंस्थेतील 'गुड बॅक्टेरिया' नष्ट होतात आणि पचनशक्ती कमकुवत होते.

Digestive power

लहान मुले आणि वृद्धांना धोका: यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने, खराब दूध त्यांच्यासाठी अधिक घातक ठरू शकते.

Cow Milk | Pudhari

कधी फेकून द्यावे?: जर दुधाचा रंग बदलला असेल, आंबट वास येत असेल किंवा गुठळ्या झाल्या असतील, तर ते दूध अजिबात वापरू नका.

Cow Milk | Pudhari

उकळलेले दूधही धोकादायक: एकदा दूध नासले की ते पुन्हा उकळून पिणेही सुरक्षित नसते, कारण त्यातील बॅक्टेरिया उष्णतेने पूर्णपणे मरत नाहीत.

Health Benefits of Milk | Canva
One Grain Meal Diet Benefits
<strong>येथे क्लिक करा...</strong>