Bird Facts| निसर्गाचा अद्भुत चमत्कार: अंधारातही वटवाघळे कसा मार्ग शोधतात?

पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्या काळोखातही वटवाघळे अतिशय वेगाने आणि अचूकपणे आपली शिकार कशी शोधतात? जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाचे विज्ञान.

वटवाघळे प्रामुख्याने 'इकोलोकेशन' तंत्राचा वापर करतात. ते हवेत उच्च-फ्रिक्वेन्सीचे अल्ट्रासोनिक आवाज सोडतात. ते मानवी कानांना ऐकू येत नाहीत.

हे आवाज वस्तूंवर आदळून परत येतात, ज्याचा अर्थ लावून वटवाघळे मनात सभोवतालचा 'ध्वनिक नकाशा' तयार करतात आणि शिकार शोधतात.

संशोधनानुसार, ही वटवाघळे अनेक प्रतिध्वनींमधून 'डॉपलर शिफ्ट' ध्वनी किंवा प्रकाशाच्या लहरींच्या वारंवारतेमध्ये होणारा बदल दर्शवणारी एक वैज्ञानिक संकल्पना) वाचून आपला अचूक मार्ग ठरवू शकतात.

वटवाघळे त्यांच्या स्वरयंत्रातून काढत असलेल्या आवाजाची तीव्रता ही जवळून जाणाऱ्या जेट इंजिनपेक्षाही जास्त असू शकते.

दाट झाडीत किंवा गोंधळलेल्या वातावरणात वैयक्तिक प्रतिध्वनींवर अवलंबून न राहता, ते हलत्या ध्वनीलहरींच्या आधारे आपला वेग कमी-जास्त करतात.

वटवाघळाचे विशेष आकाराचे मोठे कान केवळ प्रतिध्वनी पकडण्यासाठी बनले आहेत, जे शत्रू किंवा अन्नाचा मागोवा घेण्यास मदत करतात.

सर्वच वटवाघळे आंधळी नसतात; फळ खाणारी वटवाघळे आपली तीक्ष्ण दृष्टी आणि जिभेच्या साहाय्याने निघणाऱ्या 'क्लिक' आवाजाचा वापर करून मार्ग शोधतात.

वटवाघळास उपजत बुद्धीसोबतच त्यांची स्मरणशक्तीही अफाट असते, त्‍यामुळे ते लांबवर असलेल्या अन्नाच्या स्रोतांकडे दररोज न चुकता प्रवास करतात.

येथे क्‍लिक करा.