Horseshoe Crab: निळे रक्त असलेला खेकडा; तब्बल ४५ कोटी वर्षे पृथ्वीवर जसाचा तसा

Anirudha Sankpal

लिव्हिंग फॉसिल

हॉर्स शू खेकडा साडेचारशे दशलक्ष वर्षांपूर्वी जसा दिसत होता, तसाच आजही दिसत असल्याने शास्त्रज्ञ त्याला 'लिव्हिंग फॉसिल' म्हणतात.

इतिहासाचा साक्षीदार

हॉर्स शू खेकडा सुमारे अर्धा अब्ज वर्ष जुना असून, त्याने मानवाचा उत्क्रांती काळ, हिमयुग आणि डायनासोरचा अंत जवळून पाहिला आहे.

प्राचीन अस्तित्व

पृथ्वीवर पहिला जमीनवर सरपटणारा उभयचर प्राणी आणि पहिला रूजणारा वृक्ष पाहणारा हा साक्षीदार जीव आहे.

गॅलेक्टिक वय

सूर्य आपल्या गॅलक्सीची प्रदक्षिणा पूर्ण करतो, त्या दोन पूर्ण चक्रांचा काळ या खेकड्याच्या वयादरम्यान पूर्ण झाला आहे.

अद्भुत निळे रक्‍त

हॉर्स शू क्रॅबच्या शरीरात असणारे निळे रक्‍त अतिशय संवेदनशील असून, ते कोणत्याही लहान बॅक्टेरियाच्या संपर्कात येताच क्षणात गोठते.

अद्वितीय संवेदनशीलता

या रक्ताच्या पातळीची संवेदनशीलता आजवर कोणतीही मानवनिर्मित मशीन मॅच करू शकलेली नाही.

लसीकरण आणि औषधे

१९७० मध्ये शोध लागल्यापासून मानवाच्या शरीरात दिली जाणारी प्रत्येक लस आणि इंजेक्शन्सचे ड्रग्स सर्वप्रथम याच निळ्या रक्ताच्या चाचणीतून पास केले जातात.

मानवाचे रक्षण

हा प्राचीन जीव स्वतः तर कोट्यवधी वर्षे टिकून राहिलाच, परंतु आपल्या मानवी शरीराला आणि आरोग्याला सुरक्षित ठेवण्यातही मोलाची मदत करत आहे.

येथे क्लिक करा