Namdev Gharal
Horned Lizard ही एक अशी पाल आहे जी अमेरिका, मेक्सिकोच्या वाळवंटी भागामध्ये आढळते. हिचा ‘सेल्फ डिफेन्स’ संपूर्ण प्राणिजगतात वेगळा ठरतो.
आकाराने ही लहान असते साधारण 6 ते 13 सेंटीमीटर (म्हणजेच 2.5 ते 5 इंच) एवढी असते. तर वजन सरासरी 25 ते 90 ग्रॅम इतकं असतं.
पण या पालीवर जेव्हा शत्रू (कोल्हे, कुत्रे, किंवा पक्षी)जेव्हा अटॅक करतो तेव्हा. ती एक अनोखी शक्कल लढवते ती आपल्या डोळ्यातून समोरच्या प्राण्याच्या चेहऱ्यावर थेट रक्ताची चिळकांडीच मारते
या रक्ताला एक विशिष्ट वास असतो. रक्ताचा लालभडक रंग व येणारा उग्र वास पाहून शत्रू प्राणी हादरतो तात्काळ काढता पाय घेतो
अभ्यासकांनी हिची रक्त फेकण्याची क्षमता पाहिली तर ते अवाक् झाले, आकाराने ही लहान असूनही एकावेळी ही पाल 3 फूटांपर्यंत रक्त फेकू शकते.
तिच्या डोळ्यांच्या मागे एक लहान रक्तवाहिनी असते ज्यावेळी तिला समोरच्यापासून धोका आहे असे वाटते त्यावेळी ती रक्तवाहिनी फोडते. ती पुन्हा आहे तशी व्यवस्थित होते.
तिच्या शरीरावर काटेरी शिंगासारखे उंचवटे असतात जे तिला धोकादायक दिसायला मदत करतात. हिचा आहार म्हणजे जास्त करुन मुंग्या असतात.
सर्व Horned Lizard पालीच्या प्रजातींना ही कला येत नाही; काही विशिष्ट प्रजातींनाच ती शक्य असते, जसे Texas horned lizard हिचा प्रामुख्याने समावेश असतो.
रक्त फेकण्याशिवाय ज्यावेळी धोका जाणवतो तेव्हा ही पाल स्वतःला वाळूमध्ये लपवते किंवा शरीर फुगवून मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते
ही पाल जरी आकाराने लहान असली, तरी तिची शिंगं, काटेरी त्वचा आणि रक्त फेकण्याची कला यामुळे ती वाळवंटातील सर्वात भयानक लहान प्राण्यांपैकी एक मानली जाते.