Three-wattled Bellbird |घंटे सारखा आवाज काढणारा मिशीवाला पक्षी

Namdev Gharal

Three-wattled Bellbird हा असा पक्षी आहे ज्याचे नाव घंटा वाजल्यासारखा तीव्र आवाज व चोचीजवळ असलेल्या मिशीसारख्या दिसणाऱ्या लटकनांमुळे (wattles) पडले आहे

हा पक्षी मुख्यतः कोस्टारिका, होंडुरास, पनामा आणि निकारागुआ या मध्य अमेरिकन देशांच्या पर्वतीय भागात आढळतो.

नर पक्ष्याचा रंग पांढरा व तपकिरी असतो आणि त्याच्या चोचीच्या वरून तीन काळ्या लटकणी खाली लोंबकळतात. मादी मात्र हिरवट-तपकिरी रंगाची असते आणि तिला लटकणी नसतात.

या पक्ष्याचा आवाज अत्यंत जोराचा आणि धातूसारखा “घराची बेल वाजल्यासारखा” (bell) वाटतो — म्हणूनच त्याला “Bellbird” असे नाव आहे.

याचा आवाज इतका तिव्र व जोरदार असतो की तो १ किलोमीटर अंतरावरून सुद्धा सहज ऐकू येऊ शकतो

हा पक्षी प्रामुख्याने फळांवर, विशेषतः अवोकाडो सारख्या लहान फळांवर उपजीविका करतो. तो बीज पसरविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो.

नर बेलबर्डच्या त्या तीन लटकणी (wattles) (मिशांसारखा दिसणारा अवयव )सतत हलत असतात आणि ते त्याच्या आकर्षणाचे प्रमुख चिन्ह मानले जाते.

हा पक्षी मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा आवाज असलेला आणि लक्षवेधी पक्ष्यांपैकी एक मानला जातो. त्याचा आवाज जंगलात प्रतिध्वनी निर्माण करतो.

मादीला आकर्षित करण्यासाठी नर पक्षी पावसाळ्यात जोरजोरात घंटेसारखा आवाज करतो.