Namdev Gharal
मधामाशा या चिडल्याकी कोणत्याही प्राणी पक्ष्यावर - माणसांवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण एक असा पक्षी आहे की जो थेट मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करतो.
'हनी बझार्ड' (Honey Buzzard) असे या शिकारी पक्ष्याचे नाव असून हा आश्चर्यकारक पक्षी आहे. याच्या नावावरून जरी तो 'मध' खाणारा वाटत असला, तरी त्याचे मुख्य अन्न काहीतरी वेगळेच आहे.
मधमाश्यांचा कर्दनकाळ! हा पक्षी इतर शिकारी पक्ष्यांप्रमाणे केवळ मांस खात नाही, तर याचे मुख्य अन्न मधमाशा आणि गांधील माश्यांचे पोळे आहे.
याला 'हनी' बझार्ड म्हणतात कारण याला मधमाशांच्या पोळ्यातील मध, मेण आणि मुख्यत्वे माशांच्या अळ्या (Larvae) खायला खूप आवडतात.
मधमाशा चावतात की नाही : मधमाशांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी निसर्गाने याला खवल्यांसारखी दाट पिसे दिलेली असतात. पिसे त्याच्या डोळ्यांच्या बाजूला आणि चोचीच्या भोवतीही असतात. त्यामुळे माशा चावत नाहीत
मधमाशांचे निरीक्षण : हा पक्षी तासन् तास झाडाच्या फांदीवर शांत बसून मधमाश्यांच्या हालचालींचे निरीक्षण करतो. माश्या कुठे जातात हे पाहून तो जमिनीखालील किंवा झाडावरील पोळ्याचा अचूक शोध घेतो.
पोळे जमिनीखाली असले तरी हा पक्षी आपल्या मजबूत पायांनी आणि नख्यांनी माती उकरून पोळे बाहेर काढतो. हे त्याचे एक वैशिष्ट्य आहे जे इतर शिकारी पक्ष्यांमध्ये कमी आढळते.
हे स्थलांतर करणोर पक्षी आहेत. हिवाळ्यात ते युरोप आणि उत्तर आशियातून दक्षिण आफ्रिका किंवा दक्षिण आशियाकडे (भारताकडे) हजारो मैलांचा प्रवास करतात.
याचे डोळे: पिवळसर रंगाचे चमकदार असतात तसेच शेपटीवर गडद पट्ट्या असतात.