पुढारी वृत्तसेवा
सर्दीत डँड्रफ का वाढतो?
थंड हवेमुळे स्काल्प कोरडा होतो आणि त्यामुळे डँड्रफ पटकन वाढतो.
मार्केटमधील केमिकल शॅम्पूची समस्या
अँटी-डँड्रफ शॅम्पूमधील सल्फेट-पॅराबेनमुळे केस अधिक कोरडे होतात.
10 रुपयांत घरचा हर्बल शॅम्पू शक्य!
फक्त रीठा, शिकाकाई आणि आवळा वापरून नैसर्गिक शॅम्पू तयार करू शकता.
साहित्य गोळा करा
5 रीठे, 1 चमचा शिकाकाई, 1 चमचा आवळा पावडर याची किंमत 10–12 रुपयेच.
सर्व साहित्य उकळा
एका भांड्यात 2 कप पाणी घेऊन साहित्य 10 मिनिटे उकळा.
मिश्रण थंड होऊ द्या
पूर्ण थंड झाल्यावर रीठे मऊ झालेले असतात ते हाताने दाबून फेस काढा.
मिश्रण गाळून घ्या
फायबर किंवा मलमलच्या कपड्यातून गाळा. तुमचा हर्बल शॅम्पू तयार!
आठवड्यातून 2 वेळा वापरा
स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करून हेअर वॉश करा.
नियमित वापराचे फायदे
डँड्रफ कमी होतो, केस मऊ राहतात आणि रासायनिक नुकसानही होत नाही.