घरीच बनवा रवाळ, सुगंधी आणि चवदार तूप! कढवताना 'या' ४ सोप्या टीप्स वापरा अन् बघा कमाल

मोनिका क्षीरसागर

साठवलेली साय (मलई) फ्रीजमधून काढून सामान्य तापमानावर आणा.

साय मिक्सरमध्ये किंवा रवीने घुसळून लोणी (बटर) तयार करा आणि ते 2-3 वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

जाड बुडाच्या भांड्यात मध्यम आचेवर हे लोणी हळू हळू वितळायला ठेवा.

लोणी वितळल्यावर लगेच ढवळू नका; ते आपोआप उकळून फेस कमी होऊ लागेल.

तूप कढवताना त्यात 2-3 विड्याची पाने किंवा एक चिमूट मेथीचे दाणे टाका.

कढईतील फेस पूर्णपणे शांत होऊन, तूप सोनेरी दिसू लागले आणि बुडाशी हलका तपकिरी चोथा जमा झाला की गॅस बंद करा.

गरम तूप लगेच गाळू नका; 5 मिनिटे थांबा आणि नंतर स्वच्छ व कोरड्या स्टीलच्या गाळणीतून गाळून घ्या.

बस्स! तयार आहे तुमचं रवाळ, सुगंधी आणि चवदार घरगुती शुद्ध तूप

येथे क्लिक करा...