shreya kulkarni
चमकदार त्वचा ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी नियमितपणे त्वचेचे एक्सफोलिएशन (त्वचा साफ करणे) करणं महत्त्वाचं ठरतं.
बाजारात मिळणाऱ्या स्क्रब्सपेक्षा किचनमध्ये सहज मिळणाऱ्या काही नैसर्गिक घटकांपासून तुम्ही उत्कृष्ट स्क्रब तयार करू शकता. यामध्ये रासायनिक घटक नसल्याने हे स्किनसाठी सौम्य व सुरक्षित असतात.
चला तर पाहूया असे कोणते पदार्थ आहेत जे तुमच्या किचनमध्ये आहेत आणि त्वचेसाठी वरदान ठरू शकतात.
गर्मीच्या दिवसांत घाम आणि धुळीमुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, पिंपल्स, वाइटहेड्स अशा समस्या होतात. त्वचा 8 ते 10 दिवसांनी एक्सफोलिएट केल्यास डेड स्किन, धुळीचे थर हटतात आणि त्वचेचा नैसर्गिक तेज टिकून राहतो.
मसूर डाळ उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे. काही तास पाण्यात भिजवून, मिक्सरमध्ये वाटून त्यात कच्चं दूध मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर लावून सौम्य सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. डेड स्किन निघून त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल.
ओट्स हे सेंसिटिव्ह त्वचेसाठीही योग्य मानलं जातं. ओट्समध्ये दही किंवा पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि त्याने चेहऱ्याला किंवा हातपायांना स्क्रब करा. हा स्क्रब त्वचा सौम्यपणे साफ करतो.
जरी आरोग्यासाठी साखर कमी खाण्याचा सल्ला दिला, तरी त्वचेसाठी ती एक चांगली स्क्रबिंग एजंट ठरते. साखर + मध / बदाम तेल / ऑलिव्ह ऑईल मिसळून स्क्रब तयार करा. हातपायांसाठी त्यात लिंबाचा रस मिसळल्यास काळसरपणा कमी होतो.
कॉफी पावडर त्वचेचं एक्सफोलिएशन करताना ब्लड सर्क्युलेशन वाढवते. यासाठी कॉफी पावडर + नारळ तेल / ऑलिव्ह ऑईल मिसळून सौम्यपणे त्वचेला स्क्रब करा. त्वचा ताजीतवानी आणि चमकदार दिसेल.
बाजारातील स्क्रब्स सर्वांनाच सूट होत नाहीत, त्यामुळे घरगुती पर्याय अधिक फायदेशीर ठरतो.