shreya kulkarni
पावसाळ्यात तेलकट त्वचेचा त्रास वाढलाय? आता काळजी सोडा, कारण उपाय तुमच्या घरातच आहे.
केमिकल असलेल्या उत्पादनांऐवजी वापरा हे ३ सोपे आणि नैसर्गिक फेस पॅक, जे देतील चमकदार त्वचा.
तेलकटपणा शोषून घेण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून लावा. त्वचा होईल फ्रेश!
त्वचेवरील घाण आणि मृत पेशी काढण्यासाठी बेसन, हळद आणि दह्याचा पॅक लावा. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.
मुरुमांना दूर ठेवण्यासाठी आणि त्वचेला आराम देण्यासाठी कोरफड, चंदन आणि लिंबाचा रस असलेला पॅक उत्तम आहे.
हे फेस पॅक आठवड्यातून १ ते २ वेळा वापरा. चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवून स्वच्छ पाण्याने धुवा.
पावसाळ्यात तेलकट त्वचा असल्यास मेकअप कमीत कमी करा आणि त्वचा नेहमी स्वच्छ ठेवा.
या सोप्या घरगुती उपायांनी या पावसाळ्यात तुमची त्वचा तेलकट नाही, तर निरोगी आणि चमकदार दिसेल.