अंजली राऊत
फक्त तीन सोप्या स्टेप्समुळे एक नैसर्गिक हँडमेड क्रीम बनवू शकतात, ज्यामुळे तुमचे नाजूक होत मऊ राहतील
देशी तूप, खोबरेल तेल आणि तुमच्या आवडीचे आवश्यक तेलाचे 5-10 थेंब घ्या जसे की, लैव्हेंडर तेल किंवा गुलाब तेल
सर्वप्रथम, एक लहान वाटीमध्ये देशी तूप आणि खोबरेल तेल टाका.
उकळत्या पाण्यावर ती लहान वाटी ठेवा किंवा ही वाटीतील घटक वितळवण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरा, मिश्रण जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या.
वाटीतील साहित्य पूर्णपणे वितळेपर्यंत चांगले ढवळून घ्या, गॅसवरून काढून हे मिश्रण थंड करा
मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात तुमच्या आवडीचे तेलाचे थेंब टाका आणि चांगले ढवळा जेणेकरून तेल एकसमान मिसळा.
तयार केलेले हे द्रव मिश्रण स्वच्छ, कोरड्या, हवाबंद काचेच्या भांड्यात किंवा कंटेनरमध्ये ओतून घ्या
क्रीम पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आणि क्रिमी पोत येईपर्यंत खोलीच्या तपमानावर किंवा रेफ्रिजरेटरमध्ये राहू द्या.
आता हे नैसर्गिक हँडमेड क्रीम तयार आहे, ते थंड आणि कोरड्या जागी ठेवा, एक स्पॅटुला वापरून त्यानंतर अप्लाय करा