पुढारी वृत्तसेवा
आले आणि तुळशीच्या रसाचे काही थेंब कपाळावर लावा. गरम पाण्यात थोडं मीठ घालून पाय ठेवले तर आराम मिळतो. लिंबाचा रस आणि कोमट पाण्याचं मिश्रण पिण्याने डोकेदुखी कमी होते. पुदिन्याच्या तेलाचा वास घेतल्यास झटपट आराम मिळतो.
कोमट पाण्यात जिरे, सैंधव मीठ आणि लिंबू मिसळून प्या. आलं आणि मध एकत्र घेतल्याने गॅस, उलट्या व मळमळ कमी होते. हिंग आणि थोडं कोमट पाणी घेतल्यास पचन सुधारते. जेवणानंतर तुळशीची दोन पानं चावून खा.
गरम पाण्याच्या वाफेचा श्वास घ्या. आले, मध आणि लिंबाचा चहा दिवसातून दोनदा घ्या. मीठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा. हळद आणि काळं मीठ घालून गरम दुध प्या.
खजूर आणि बदाम रात्री दुधात भिजवून सकाळी खा. चिमूटभर हळद घातलेलं गरम दूध पिण्याने ऊर्जा वाढते. सकाळी सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि पुरेशी झोप आवश्यक. नारळपाणी आणि लिंबूपाणी प्या — शरीरातील मीठ-पाण्याचं संतुलन राखा.
चण्याचं पीठ + हळद + दूध = नैसर्गिक फेसपॅक. अॅलोव्हेरा जेलने चेहरा स्वच्छ व तजेलदार राहतो. केस गळतीसाठी मेथीदाणे रात्री भिजवून सकाळी वाटून लावा. तिळाचं किंवा नारळाचं तेल आठवड्यातून दोनदा मसाज करा.
लवंग किंवा लवंग तेलाने दातदुखी कमी होते. हळद आणि मीठाने दात घासल्यास हिरड्या मजबूत होतात. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने जीवाणू नष्ट होतात.