पुढारी वृत्तसेवा
कफ गरम पाण्याची वाफ घ्या
गरम पाण्याची वाफ घेतल्याने घट्ट कफ पातळ होतो, श्वसनमार्ग मोकळा होतो.
तुम्ही गरम पाण्यात निलगिरीचे ४-५ थेंब तेल मिसळू शकता
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून गुळण्या करा. घशाला आराम मिळतो.
आले आणि मध
आल्याचा रस-मध एकत्र करून घेतल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते.
तुळस-आल्याचा काढा
तुळशीची पाने व किसलेले आले पाण्यात उकळून एक कप काढा तयार करून प्या
कोमट हळद दूध
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद घाला
यामुळे घसा आणि श्वसनमार्गाला आराम मिळतो.
वरील उपाय लहान मुलांसाठी करू नये