Public Doors Safety: सार्वजनिक ठिकाणचे दरवाजे बाहेरच्या बाजूलाच का उघडतात?

Anirudha Sankpal

चित्रपट गृह किंवा जवळपास सर्व सार्वजनिक ठिकाणी असलेले दरवाजे हे बाहेरच्या बाजूला उघडणारे असतात. यामागे योगायोग आहे की काही विशिष्ट कारण?

ऐतिहासिक शोकांतिका

शिकागोमधील इरोक्वॉईस थिएटर (१९०३) हे "अग्निरोधक" असल्याचा दावा केला जात होता, पण ते मृत्यूचा सापळा ठरले.

आगीचा भडका

स्टेजवरील दिव्याच्या एका ठिणगीमुळे पडद्यांना आग लागली आणि काही मिनिटांतच संपूर्ण थिएटर आगीच्या विळख्यात आले.

चुकीचे दरवाजे

त्याकाळी बाहेर पडण्याचे दरवाजे आतल्या बाजूला उघडत असत, जे या भीषण दुर्घटनेचे मुख्य कारण ठरले.

भीती आणि गर्दी

जीव वाचवण्यासाठी लोक दरवाजाकडे धावले, पण गर्दीच्या दबावामुळे दरवाजे उघडणे अशक्य झाले आणि ते उलट घट्ट बंद झाले.

बंद दरवाजे

तिकीट दरानुसार प्रेक्षकांना वेगळे ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने काही दरवाजे कुलूप लावून बंद ठेवले होते, जे अत्यंत घातक ठरले.

मोठी जीवितहानी

दरवाजा बाहेरच्या दिशेला ढकलून उघडता न आल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ६०२ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

कायद्यात बदल

या घटनेनंतर जगभरातील इमारतींचे नियम बदलले; आता सार्वजनिक ठिकाणचे सर्व एक्झिट दरवाजे बाहेर उघडणे अनिवार्य झाले.

सुरक्षा नियम

नवीन नियमांनुसार, दरवाजे नेहमी उघडे असणे आणि अंधारातही स्पष्ट दिसणे बंधनकारक करण्यात आले आहे.

येथे क्लिक करा