पुढारी वृत्तसेवा
प्रत्येकाचा आवडता टाईमपास
चित्रपट पाहताना असो किंवा मित्रांसोबत गप्पा मारताना, 'पॉपकॉर्न' हा आपल्या सर्वांचाच अगदी आवडता पदार्थ आहे.
हा इतिहास हजारो वर्षे जुना आहे
पण तुम्हाला माहीत आहे का? आपण आवडीने खाणाऱ्या या पॉपकॉर्नचा इतिहास तब्बल 9 हजार वर्षे जुना आहे.
नक्की कुठे झाला शोध?
पॉपकॉर्नचा उगम प्रामुख्याने अमेरिका खंडातील (मेक्सिको) भागात झाला, जिथे पहिल्यांदा मक्याची शेती केली गेली.
पुरातत्व विभागाला सापडले पुरावे
वैज्ञानिक संशोधनानुसार, न्यू मेक्सिकोमधील एका गुहेत सुमारे ४,००० वर्षे जुने पॉपकॉर्नचे दाणे सापडले होते!
प्राचीन काळातील बनवण्याची पद्धत
पूर्वीचे लोक मक्याचे दाणे थेट गरम वाळूवर किंवा आगीवर ठेवून ते फुटण्याची (पॉप होण्याची) वाट पाहायचे.
थिएटर आणि पॉपकॉर्नचे नाते
१९३० च्या दशकात अमेरिकेत आलेल्या 'महामंदी'च्या काळात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून पॉपकॉर्न सिनेमा हॉलमध्ये तुफान लोकप्रिय झाले.
'या' शोधामुळे क्रांती झाली
१८९३ मध्ये 'चार्ल्स क्रेटर्स' यांनी पहिल्या फिरत्या पॉपकॉर्न मशीनचा शोध लावला आणि हा पदार्थ घराघरांत पोहोचला.
आजचा जागतिक ट्रेंड
आज साध्या मिठापासून ते चीज आणि कॅरॅमलपर्यंत, अनेक फ्लेव्हर्समध्ये पॉपकॉर्न जगभरातील लोकांचे मनोरंजन करत आहे