मोहन कारंडे
'रुपया' हा शब्द संस्कृतमधील 'रूप्यकम्' या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ आहे 'चांदी' किंवा 'सुंदर रूप'. प्राचीन काळात चांदीचे नाणे म्हणजेच 'रूप्य'.
त्या काळात 'पण', 'कर्षापण' आणि 'रूप्य' अशा नावांची नाणी व्यापारासाठी वापरली जात. ही नाणी तत्कालीन अर्थव्यवस्थेचा मूलाधार होती.
१६व्या शतकात शेर शाह सूरीने पहिल्यांदा 'रुपया' नावाने औपचारिक चांदीचे नाणे जारी केले. यामुळे 'रुपया' हे नाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे ठरले.
अकबरासारख्या सम्राटांनी रुपये चलन म्हणून अधिक मजबूत केले. त्यांचे नाणे शुद्धतेसाठी ओळखले जात होते आणि भारतभर मान्यता होती.
ब्रिटिशांनी 'कंपनी रुपया' चांदीवर आधारित करून संपूर्ण भारतात लागू केला. यामुळे रुपयाला नवीन औपचारिक ओळख मिळाली.
स्वातंत्र्यानंतर भारताने रुपयाला कायम ठेवले. 1957 मध्ये दशांश प्रणाली लागू झाली : 1 रुपया = 100 पैसे.
2010 मध्ये '₹' हे अधिकृत प्रतीक स्वीकारले गेले, जे भारताच्या आर्थिक बळाचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक बनले.
'रुपया' ही केवळ चलनाची नाही, तर भारताच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची गोष्ट आहे, जी आजही आपल्याला जोडून ठेवते.