युद्धकाळातील इमर्जंन्सीमध्ये ‘या’ वस्‍तू तुमच्या खूप उपयोगी पडतील

Namdev Gharal

लाईटस्‌

बॅटरी, फ्लड लाईटस्‌ , मेणबत्ती, इत्‍यादी खूप उपयोगी पडतात

फर्स्ट एड कीट

यामध्ये ऍंटीसेप्टीक क्रीम, कापडी पट्टी, पेन किलर गोळ्‍या, डेटॉल यांचा समावेश असावा

हायजिन किट

यामध्ये साबण, सेनेटरी पॅड, टिश्यू पेपर, पाणी स्‍वच्छ करणाऱ्यासाठी क्‍लोरीन गोळया यांचा समावेश असावा

चार्जर, पॉवर बँक

फोन चार्जर, पॉवर बँक, हे कायम फुल चार्ज असले पाहिजेत. इमरजेंसी नंबर छोट्या डायरीत नोंद असावेत

ब्‍लॅक आऊटसाठी तयारी

खिडक्‍यांमधून घरातील उजेड बाहेर जाऊ नये म्‍हणून काळे जाड कापडाचे पडदे असावेत

उपयोगी हत्‍यारे

यामध्ये छोटा चाकू, काडेपटी , लाईटर, सेफ्टी पिन्स, पेन पेपर इत्‍यादीचे कीट जवळ बाळगावे

बॅटरीवर चालणारा रेडीओ

ब्‍लॅक आऊट होतो तेव्हा विज खंडीत होते यावेळी इमरजेंसी संदेश ऐकण्यासाठी बॅटरीवर चालणारा छोटा रेडीओ असावा

रोख रक्‍कम व महत्‍वाची कागपत्रे

आधार कार्ड, पासपोर्ट सारखे महत्‍वाचे दस्‍ताऐवज जवळ बाळगावेत, तसेच काही रोख रक्‍कमही जवळ असावी