पुढारी वृत्तसेवा
अपचन, गॅस, पोट फुगणे आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांवर हिंग अत्यंत प्रभावी आहे.
कोमट पाण्यात चिमुटभर हिंग आणि सैंधव मीठ टाकून पिल्यास त्वरित आराम मिळतो.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखी आणि क्रॅम्प्सपासून सुटका मिळवण्यासाठी हिंगाचे सेवन फायदेशीर ठरते.
हिंगामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
मध -आल्याच्या रसासोबत चिमुटभर हिंग खाल्ल्याने खोकला, दमा आणि कफचा त्रास कमी होतो.
हिंगामध्ये रक्ताच्या गाठी होऊ न देणारे (blood thinning) गुणधर्म असतात.
हे रक्तप्रवाह सुधारून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
मायग्रेन,तीव्र डोकेदुखी असल्यास हिंगाची वाफ घेतल्यास डोकेदुखी कमी होते. (डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापर करावा)