Anirudha Sankpal
हिमालयाची उंची दरवर्षी वाढत आहे हे वैज्ञानिक सत्य आहे.
या वाढीमागील मुख्य भौगोलिक कारण Plate Tectonics या सिद्धांतामध्ये दडलेले आहे.
सुमारे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी युरेशियन Tectonics Plate आणि भारतीय Tectonics Plate यांची टक्कर झाली, त्यातून हिमालयाची निर्मिती झाली.
भारतीय Tectonics Plate अजूनही दरवर्षी उत्तरेकडे ४ ते ५ सेंटीमीटर या वेगाने युरेशियन Tectonics Plate खाली सरकत आहे.
दोन भूखंडाचे Tectonics Plate एकमेकांवर आदळल्यावर प्रचंड दाब निर्माण होतो.
या दाबामुळे दोन्ही Tectonics Plate च्या कडांमधील खडकांचे थर तुटतात आणि वळतात.
परिणामी, खडकांचा थर सतत वरच्या दिशेने उचलला जातो, ज्यामुळे पर्वतांची उंची वाढते.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हिमालयाची उंची दरवर्षी काही मिलीमीटर ते १ सेंटीमीटरपर्यंत वाढत आहे.
हा सततचा दाब आणि टक्कर हेच हिमालयाच्या सततच्या उंची वाढण्याचे प्रमुख कारण आहे.