पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राची पारंपरिक थाळी म्हणजे केवळ चवदार जेवण नव्हे, तर शरीराला हवी असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजांची परिपूर्ण शिदोरी आहे.
आहारशास्त्राच्या संशोधनानुसार, वरण-भात, भाजी आणि चपाती या पारंपरिक संयोजनात ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ आणि ‘अॅमिनो अॅसिडस्’चा योग्य समतोल असतो.
संतुलित आहार मानला जाणार्या महाराष्ट्रा थाळीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रिपोर्टनुसार, ताक, सोलकढी किंवा कोशिंबिरेसारख्या प्रोबायोटिक्स हे अन्नाचे पचन सुधारते.
ताक, सोलकढी किंवा कोशिंबिरेसारख्या पदार्थ आतड्यांमधील गुडबॅक्टेरिया वाढवून रोगप्रतिकारशक्ती बळकट करतात.
वाफाळलेला गरमागरम भात आणि वरणाचा सोबतीमुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. डाळींमधील प्रथिने स्नायूंच्या बळकटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहण्यास मदत होते.
खमंग ठेचा, चटणी आणि घरगुती लोणच्याचे काही थेंब संपूर्ण जेवणाची रंगत वाढवतात. यातील नैसर्गिक मसाले चयापचय (Metabolism) वेगाने चालवण्यास साहाय्य करतात.
आता जंक फूडला बायबार करत आरोग्याची गुरुकिल्ली असणाऱ्या पारंपरिक महाराष्ट्रीय थाळीला तुमच्या डिशमध्ये नक्की स्थान द्या!