Fibre Foods Benefits : पोट साफ ठेवायचंय? जाणून घ्या फायबरयुक्त पदार्थांचे फायदे

पुढारी वृत्तसेवा

फायबरयुक्त पदार्थांमुळे अन्नाची पचनसंस्थेतील हालचाल सुरळीत राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

AI-generated image

पुरेशा प्रमाणात फायबर घेतल्यास मळाला योग्य आकार मिळतो आणि विसर्जन सुलभ होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येतो.

AI-generated image

फायबर पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंना पोषण देऊन आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते.

AI-generated image

फायबर युक्‍त आहारामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

AI-generated image

विद्राव्य फायबर (Soluble fibre) शरीरातील 'वाईट' म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

Pudhari | File photo

फायबर युक्‍त आहारामुळे साखरेचे शोषण संथ गतीने होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

File photo

नियमितपणे फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

AI-generated image

फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांतून मिळणारे आवश्यक पोषक घटक संपूर्ण आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात.

टीप: ही माहिती मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्‍यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.