Fatty foods : चरबीयुक्त आहाराचा हाेताे थेट स्मरणशक्तीवर परिणाम! नवीन संशोधन काय सांगते?

पुढारी वृत्तसेवा

मेटाबॉलिक सिंड्रोम (चयापचय क्रियेसंबंधी आजार) स्मरणशक्तीशी संबंध आहे, हे आतापर्यंत अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

मेंदू शरीराच्या वजनाच्या फक्त २ टक्‍के असूनही सुमारे २० टक्‍के उर्जेचा वापर करतो.

नुकत्याच झालेल्या प्राण्यांवरील संशोधनानुसार, जास्त स्निग्ध पदार्थ मेंदूतील विशिष्ट मज्जातंतूंच्या कार्यप्रणालीवर परिणाम करून स्मृती निर्मितीला अडथळा आणते.

आहाराचा मेंदूवर होणारा परिणाम याबाबतचा संशोधन लेख 'न्यूरॉन ट्रस्टीड सोर्स जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे.

संशोधनातून दिसून आले आहे की, जास्त चरबीयुक्त आहारामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम धोका वाढू शकतो.

संशोधकांनी उंदरांवर केलेल्‍या संशाेधनात हिप्पोकॅम्पसमधील मेंदूच्या पेशींचा अभ्‍यास केला.

संशोधकांनी उंदरांना दोन दिवसांसाठी उच्च चरबीयुक्त आहार दिला. अपेक्षेप्रमाणे, आहाराच्या आकलनशक्तीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले.

शरीरातील चयापचय क्रियेत बिघाड मेंदूतील हिप्पोकॅम्पस नावाच्या भागाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो.

हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा भाग स्मृती निर्मितीसाठी महत्त्वाचा असून, तो जास्त स्निग्ध पदार्थांच्या आहाराच्या दुष्परिणामांना अधिक संवेदनशील असल्याचे नवीन संशाेधनात दिसले.

प्राण्यांवरील संशोधनानुसार, जास्त स्निग्ध पदार्थ असलेला आहार अल्झायमरसारख्या मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचा धोका वाढवतो.

नवीन संशोधनातील निष्कर्षामुळे स्मृतिभ्रंशावरील नव्या उपचारांची दिशा मिळू शकते, असा विश्वास संशोधक व्‍यक्‍त करत आहेत.

येथे क्‍लिक करा.