पुढारी वृत्तसेवा
कोलेस्ट्रॉल फक्त वजनाशी संबंधित आहे का?
अनेकांना वाटतं की कोलेस्ट्रॉलची समस्या फक्त लठ्ठ लोकांमध्येच होते. पण हे पूर्णपणे खरं नाही.
बारीक लोकांमध्येही धोका
तज्ज्ञांच्या मते कमी वजन असलेल्या लोकांमध्येही कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
चुकीचा आहार हे मोठं कारण
जास्त जंक फूड, तळलेले पदार्थ आणि ट्रान्स फॅट्स खाल्ल्यामुळे वजन कमी असतानाही कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.
व्यायामाचा अभाव
शारीरिक हालचाल कमी असल्यास शरीरात ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.
अनुवांशिक कारणं
काही लोकांमध्ये कौटुंबिक इतिहासामुळेही कोलेस्ट्रॉलची समस्या दिसू शकते.
स्ट्रेस आणि जीवनशैली
जास्त ताण, झोपेची कमतरता आणि असंतुलित जीवनशैली यामुळेही कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.
नियमित तपासणी गरजेची
वजन काहीही असो, नियमित ब्लड टेस्ट करून कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे आवश्यक आहे.
संतुलित आहार घ्या
फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश करा.
सक्रिय जीवनशैली ठेवा
दररोज व्यायाम, चालणे आणि हेल्दी सवयी ठेवणे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.