पुढारी वृत्तसेवा
जास्वंद फुल, पानांमध्ये मुबलक प्रमाणात अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन सी असते
यामुळे केस मऊ, चमकदार होतात आणि गळणे कमी होते.
साहित्य- जास्वंदाची लाल फुले - ५ ते ६, जास्वंदाची ताजी पाने - ७ ते ८, दही - २-३ चमचे, खोबरेल तेल १ चमचा
बनवण्याची पद्धत-जास्वंदाची फुले आणि पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
जास्वंदाची फुले आणि पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
फुलांमधील हिरवा देठ आणि परागकण काढून टाका.
मिक्सरच्या भांड्यात फुले, पाने थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या
या तयार पेस्टमध्ये २-३ चमचे दही, १ चमचा तेल घालून नीट मिक्स करा.
हा हेअरपॅक टाळूपासून (scalp) केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावा.
३० ते ४० मिनिटे हेअरपॅक केसांवर राहू द्या, नंतर कोमट पाणी, शॅम्पूने धुवून टाका
आठवड्यातून एकदा हा पॅक लावल्यास केस अत्यंत मऊ, चमकदार, मजबूत होतात