अविनाश सुतार
स्वर्गीय नर्तक पक्षी हा पॅराडायसिडी (Paradisaeidae) कुळातील अत्यंत सुंदर व दुर्मिळ पक्षी आहे
इंग्रजीत त्याला Bird of Paradise असे म्हणतात. हा पक्षी आपल्या आकर्षक पिसांमुळे व विलक्षण नृत्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे
हा पक्षी न्यू गिनी, इंडोनेशिया आणि भारतातील उष्णकटिबंधीय जंगलांत आढळतो, दाट, ओलसर जंगलात वास्तव्य करतो
नर पक्षी अत्यंत रंगीबेरंगी व लांब, रेशमी पिसांनी सजलेला असतो, मादी तुलनेने साध्या रंगाची असते
किटकभक्षी असणाऱ्या या पक्षाचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या पूर्वार्धात सुरू होतो. विशेष म्हणजे नराला जवळपास फुटभर लांबीची शेपटी असते
नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी नृत्य, उड्या व पिसांचे प्रदर्शन करतो, त्यामुळे त्याला “नर्तक पक्षी” असे म्हणतात
प्रजनन काळात नर पक्षी विशिष्ट झाडावर किंवा फांदीवर उभा राहून नृत्य करतो पिसे फुलवून, आवाज काढून तो मादीचे लक्ष वेधतो
विविध प्रकारचे किडे या पक्ष्याचे मुख्य खाद्य आहे. फळे, कीटक, लहान सरपटणारे जीव त्याचे अन्न आहे
मध्यप्रदेश राज्याचा हा 'राज्यपक्षी' आहे, त्याला हिंदीमध्ये 'दूधराज' आणि सुल्ताना बुलबुल अशी नावे आहेत. बांधवगड राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणावर आढळतो