अविनाश सुतार
आपल्या शरीराला व मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप अत्यावश्यक असते, झोप न येण्याची समस्या स्त्री व पुरुष दोघांमध्येही आढळते
रात्रभर नीट झोप न झाल्यास दुस-या दिवशी अस्वस्थ वाटणे, डोके जड होणे, कंटाळवाणे वाटणे, चिडचि़डेपणा वाढणे, असा त्रास होऊ शकतो
शरीराला आवश्यक झोप न मिळाल्यास अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते
मॅनोपॉजमध्ये स्त्रीयांमधील एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी झाल्याने झोपेची समस्या निर्माण होते. त्यामुळे महिलांचे वजनही कमी होऊ शकते
वेगवेगळ्या अभ्यासातून कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे रुग्णांमध्ये आढळून आली आहेत
कामाचा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही, मोबाईल पाहणे, रात्रभर जागरण केल्याने झोपेची समस्या निर्माण होते
गाल ब्लेडर सर्जरीमध्ये पित्ताशय काढल्याने लहान आतड्यावर ताण आल्याने अपचनाचा त्रास होऊन झोपेच्या समस्या निर्माण होतात
दात कराकरा वाजविण्याच्या समस्येमुळे मज्जासंस्थेवर व शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होऊन झोपेची समस्या निर्माण होते
तुम्हाला शांत झोपेची समस्या असेल, तर वरील कारणे लागू पडू शकते, त्यामुळे तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या