Heat Stroke| उष्माघात टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स

Namdev Gharal

उन्हाळा आला की योग्य काळजी न घेतल्यास उष्माघात होऊ शकतो, उष्माघात म्हणजे सोप्या शब्दात उष्णतेचा त्रास होणे, काहीवेळा गंभीर वैद्यकीय अवस्था होऊ शकते

पण उष्माघात म्हणजे शरीरातील उष्णता नियंत्रण प्रणाली निकामी (थर्मोरॅसट) होते शरिराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ताप, घाम येणे बंद, त्‍वचा कोरडी पडणे ही याची लक्षणे आहेत.

काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही उष्माघात टाळू शकता व आपल्या शरीराचा बचाव करु शकता

सर्वात पहिले म्हणजे पाण्याचे नियोजन, उन्हाळ्यात तहान लागण्याची वाट पाहू नका दर तासाला थोडे पाणी पिणे गरजेचे आहे

नैसर्गिक पेये यामध्ये लिंबू सरबत, कोकम, ताळ, शहाळे, मठ्ठा, यांचे सेवन करा. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईडस संतूलीत राहतात

आहारामध्ये पाणीदार फळे, जसे की कंलिंगड, काकडी, संत्री, द्राक्षे, यांचा समावेश करा, आणखी एक म्हणजे कच्चा कांदा खाणे उष्माघातावर रामबाण उपाय आहे.

घराबाहेर पडताना काळजी घ्या भर उन्हात बाहेर पडणे टाळा, दुसरी गोष्ट म्हणजे सैल सर कपडे घाला, सुती कपडे शरीराचा घाम शोषूण घेण्याचे काम करतात

डोक्याला शक्यतो टोपी घालणे आवश्यक, किंवा पाढंरा रुमाल बांधणे, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांसाठी सनग्लासेस आवश्यक

घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या, यासाठी खिडक्या खुल्या ठेवा, कुलर फॅन याचा वापर करा

उष्माघाताची लक्षणेः खूप जास्त ताप, घाम येणे थांबणे, त्‍वचा कोरडी पडणे, चक्कर मळमळ,तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास त्‍वरीत डॉक्टरांना भेटा.

उन्हाळ्यात कोणत्‍या डाळी खाव्यात? व कोणत्‍या डाळी टाळाव्यात?