Namdev Gharal
मार्च मध्यावर आला आहे उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. उष्णतेमुळे पाचनशक्ती मंदावत असते अशावेळी आपल्या पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
डाळ हा आपल्या आहारातील महत्वाचा घटक, पण प्रत्येक डाळीची एक वेगळी प्रकृती असते. त्यामुळे उन्हाळ्यात डाळी निवडताना उष्ण ताशीर असलेल्या डाळी टाळाव्या किंवा कमी प्रमाणात सेवन कराव्या
या डाळींचा आहारात समावेश करावा
१. मुग डाळः ही डाळ उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम मानली जात, पचायला हलकी व शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशिर ठरते
२ मसूर डाळः ही डाळ शरीरातील पित्त कमी करण्यासाठी गुणकारी आहे. त्याचबरोबर पचायलाही हलकी असते
३. चणा डाळः ही डाळ शित प्रकृतीची असते हीचे सेवनही उन्हाळ्यात चांगले. पण ते प्रमाणात हवे कारण या डाळीमुळे काहीजणांना गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
या डाळी टाळलेल्या बऱ्या
१. उडीद डाळः ही डाळ उष्ण प्रकृतीची असते व पचायलाही जड असते, उन्हाळ्यात खाल्ल्याने पोट फूगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो
२.तुरीची डाळः ही डाळ मध्यम स्वरुपाची असली तरी काहजणांना यापासून पित्ताचा तसेच उष्णतेचाही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याच्या ऐवजी मुगडाळीला प्राधान्य द्यावे
३. कुळीथ किंवा हुलग्याची डाळः हुलगा हा अत्यंत उष्ण कडधान्य आहे. हिवाळयात याचे सेवन फायदेशीर असले तरी उन्हाळ्यात हा टाळलेलाच बरा
उन्हाळ्यात डाळ शिजवताना त्याला आमसूल, जिरे, कोकम यांची फोडणी दिल्यास डाळींचा थंड गुण वाढतो तसेच त्या पचायलाही हलक्या होतात.