health and happiness |आनंदी राहणे आणि आरोग्‍याचा काय आहे संबध?

पुढारी वृत्तसेवा

माणूस जितका जास्त आनंदी, तितके त्याचे आरोग्य उत्तम राहते, असा आपला सर्वसाधारण समज आहे.

नुकतेच आनंदी राहणे आणि आरोग्‍य याबाबत 'फ्रंटियर्स इन मेडिसिन' या शोधपत्रिकेत नवीन संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

आपण आनंदाची एक विशिष्ट पातळी ओलांडतो तेव्‍हाच आनंदी राहण्याचा फायदा आरोग्याला होतो, असे या अभ्‍यासात नमूद करण्‍यात आले आहे.

या संशोधनासाठी 'लाईफ लॅडर' या जागतिक मानकाचा वापर केला. यात शून्य (सर्वात वाईट जीवन) ते १० (सर्वोत्कृष्ट जीवन) अशा गुणांकावर आधारित लोकांच्या समाधान पातळीचे मोजमाप केले जाते.

१२३ देशांमधील २००६ ते २०२१ या काळातील आकडेवारीचा अभ्यास करण्‍यात आला. एखाद्या देशाचा सरासरी आनंद निर्देशांक १० पैकी २.७ च्या वर जातो तेव्हाच जुनाट आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूदरात घट व्हायला सुरुवात होत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

संशोधनानुसार, एकदा का आनंदाची 'किमान पातळी' (Tipping Point) ओलांडली की, प्रत्येक थोड्या वाढीव आनंदामुळे मृत्यूदरात सातत्याने घट होत जाते.

आनंदी देशांमध्ये शहरीकरणामुळे आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा चांगल्या असल्याने तिथल्या लोकांचे आरोग्य सुधारत, असल्‍याचेही संशोधनात स्‍पष्‍ट झाले.

"केवळ हसणे म्हणजे आनंद नव्हे. अर्थपूर्ण आनंदात सुरक्षिततेची भावना, सामाजिक ओढ आणि मूलभूत गरजांची पूर्तता यांचा समावेश होतो. असे आनंदी असेल तरच आरोग्‍य सुधारते, असे नवीन संशोधन स्‍पष्‍ट करते.

येथे क्‍लिक करा.