Health Tips After 40 : चाळीशी नंतर आरोग्याची घंटा वाजू नये, म्हणून आजपासूनच करा 'या' ९ गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

४० नंतर व्यायाम हा पर्याय नसून आरोग्याचा महत्त्वाचा भाग मानावा. आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा ७५ मिनिटे अधिक तीव्र व्यायाम करा

तळलेले पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स, जास्त साखर, मिठाचे पदार्थ आणि अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कमी करा, भाज्या, फळे, कडधान्ये, पौष्टिक पदार्थांचा समावेश करा

४० नंतर पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी वाढू नये याकडे लक्ष द्या. कंबर, वजन, आहार आणि शारीरिक सक्रियता यांचा एकत्र विचार करा

रात्री उशिरापर्यंत मोबाइल, टीव्ही किंवा काम करत राहण्याची सवय बदला, नियमित झोपेची वेळ ठेवणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करणे फायदेशीर ठरते

रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल तपासा, वय, कौटुंबिक इतिहास, वजन आणि इतर जोखमींनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करा

सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा यांसारख्या पदार्थांपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ४० नंतरही व्यसन सोडल्याने आरोग्याला फायदा होतो

'थोडे मद्य आरोग्यासाठी चांगले' या समजुतीवर अवलंबून राहू नका. मद्यपान करत असल्यास ते कमी करणे किंवा टाळणे हा आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय आहे

नोकरी, व्यवसाय, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक प्रश्न यामुळे ४० नंतर मानसिक ताण वाढू शकतो. दररोज काही वेळ स्वतःसाठी द्या

डोकेदुखी, अंगदुखी, अॅसिडिटी किंवा झोप न येणे यासाठी वारंवार स्वतःहून औषधे घेण्याऐवजी कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे

येथे क्लिक करा