Chronic Sleep Loss | रोज 6 तासांपेक्षा कमी झोप? शरीरावर होऊ शकतात घातक परिणाम

पुढारी वृत्तसेवा

योग्य झोपेचे चक्र पाळत नसाल, तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शरीर योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी किमान 8 तासांची झोप आवश्यक असते

6 तासांपेक्षा कमी झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो

व्यक्ती सतत 6 तासांपेक्षा कमी झोप घेत असेल, तर रक्तदाब आणि शरीरात साखर वाढू शकते. मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो

धावपळीच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढण्यामागे कामाचा ताण आणि अपुरी झोप ही प्रमुख कारणे आहेत

वृद्धावस्थेत झोपेची गरज कमी होत नाही, पण गाढ झोप येण्याची क्षमता कमी होते. यामागे इतर कारणेही असू शकतात

दीर्घकाळापासून झोपेचा अभाव राहिल्यास शरीरासाठी खूप घातक ठरू शकते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हृदयावर ताण येतो

अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, चिंता, नैराश्य आणि चिडचिड वाढू शकते

दैनंदिन कामगिरीवर परिणाम होतो, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते आणि कार्यक्षमता कमी होते

कमी झोपेमुळे शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम होतो. हृदय जास्त वेगाने काम करू लागते, साखरेची पातळी वाढते आणि पचनक्रिया कमकुवत होते

येथे क्लिक करा