Snake vs Bird Eggs | अंडी सापांची की पक्ष्यांची: कशी ओळखावीत?

पुढारी वृत्तसेवा

सापांची अंडी दगडाखाली, सुक्या पानांच्या थराखाली, बिळांमध्ये किंवा सैल मातीमध्ये आढळून येतात

भक्षकांपासून आणि हवामानापासून संरक्षण होण्यासाठी शांत, अंधाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी साप अंडी घालतात

सापांची अंडी पक्ष्यांच्या अंड्यांसारखी कडक नसतात. त्यांचे कवच मऊ व किंचित रबरासारखे असते. त्यांचा पृष्ठभाग चमकदार नसून मॅटसारखा दिसतो

अनेक सापांची अंडी फिकट रंगाची, पांढरी, ऑफ-व्हाईट किंवा हलक्या बेज रंगाची असतात. ताजी अंडी पारदर्शकही दिसू शकतात

सापाची अंडी गोल नसून लांबट (ओब्लाँग) आकाराची असतात. ती थोडी ताणलेली वाटतात, पण पूर्णपणे सममित नसतात

लहान साप ठराविक अंडी घालतात, तर मोठ्या सापांच्या अंड्याची संख्या डझनभर, तर शंभरापेक्षाही अधिक असू शकते

सापांची अंडी हाताळणे सुरक्षित नाही. कारण थोडेसी हलवली किंवा फिरवली गेल्यास खराब होऊ शकतात

सापांची अंडी काही इंच लांब असू शकतात. साधारणतः १ ते ५ इंचाची असतात. सर्व अंडी एकसारखीच असतीलच असे नाही

सापाच्या अंड्याचे कवच छिद्रयुक्त असल्याने त्यात पाणी जाण्याचा धोका असतो, म्हणून साप ओलसर जमिनीवर अंडी घालणे टाळतात

येथे क्लिक करा