लिव्हरसाठी दारूपेक्षाही 'हा' पदार्थ ठरतोय घातक

पुढारी वृत्तसेवा

लिव्हरचे वाढते आजार

आजकाल मधुमेहाप्रमाणेच लिव्हर आणि किडनीशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

सामान्य समस्या

फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फेक्शन आणि लिव्हर सिरोसिस यांसारख्या समस्या आता अगदी सामान्य झाल्या आहेत.

दारूपेक्षाही धोकादायक काय?

अनेकांना वाटते की फक्त मद्यपानामुळे लिव्हर खराब होते, पण आपल्या रोजच्या आहारातील एक पदार्थ यापेक्षाही जास्त नुकसान करतो.

alcohol mixing health risks | (Canva Photo)

हा पदार्थ कोणता?

डॉक्टरांच्या मते, लिव्हरसाठी सर्वात धोकादायक अन्न म्हणजे बियाण्यांचे तेल, ज्याला आपण 'Seed Oil' म्हणतो.

दररोजचा वापर

दुर्दैवाने, हाच पदार्थ बहुतेक लोक दररोजच्या स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापरतात.

प्रक्रिया केलेले तेल

सोयाबीन, सूर्यफूल आणि कॉर्न यांसारखी रिफाईंड तेले लिव्हरमध्ये जळजळ (Inflammation) निर्माण करू शकतात.

ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स

या तेलांमध्ये ओमेगा-६ फॅटी ॲसिड्सचे प्रमाण खूप जास्त असते, जे जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हर सेल्सचे नुकसान करते.

आरोग्यावर परिणाम

सतत अशा तेलाचे सेवन केल्याने लिव्हरवर चरबी जमा होते, ज्यामुळे पुढे जाऊन गंभीर आजार उद्भवू शकतात.

काय काळजी घ्यावी?

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी रिफाईंड ऑईलचा वापर टाळा आणि घाण्याचे तेल किंवा नैसर्गिक चरबीयुक्त पर्यायांचा विचार करा.

येथे क्लिक करा...