अविनाश सुतार
दारू पिणाऱ्यांमध्ये शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या देखील हळूहळू वाढत जातात
दारू पिणे सोडल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात काही सकारात्मक बदल दिसू लागतात
दारू न पिल्याने रक्तदाब कमी होतो, ट्रायग्लिसराइडचे प्रमाण घटते आणि दीर्घकाळात हृदयविकाराचा धोका कमी होतो
दारूमुळे फॅटी लिव्हर, सिरॉसिस आणि इतर गंभीर आजार होतात, दारू सोडल्यावर यकृत स्वतःची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती करण्यास सक्षम बनते
दारू भूक वाढवत असल्याने तळलेले किंवा जंक फूड खाण्याची प्रवृत्ती वाढवते. त्यामुळे दारू टाळल्यावर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते
डॉक्टरांच्या मते, दारू शरीरात दाह (inflammation) वाढवते, ज्यामुळे कर्करोगासारख्या आजारांची शक्यता निर्माण होते
दारू पिणे सोडल्यास अन्ननलिका, तोंड, घसा आणि स्तनाचा कर्करोग यांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो
दारू पिल्याने काही काळ बेशुद्ध झाल्यासारखी झोप येते, पण दीर्घकाळात झोपेचा दर्जा बिघडतो आणि अनिद्रा (insomnia) होण्याची शक्यता वाढते
दारू झोपेतील श्वासोच्छ्वासात व्यत्यय आणते. लघवीसाठी वारंवार उठावे लागते, त्यामुळे दारू न पिल्यास झोप अधिक गाढ आणि आरामदायक होते