अविनाश सुतार
मान्सून सुरू होताच, बेडकांचा प्रजनन काळ येतो. या काळात नर बेडकांच्या शरीरात ताण-संबंधित हॉर्मोन्स (जसे एपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन) स्रवतात
एपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन या हॉर्मोन्समुळे त्यांची त्वचा काही तासांतच मंद तपकिरीवरून चमकदार पिवळ्या किंवा सोनेरी रंगात बदलते
कर्नाटकातील पश्चिम घाटात स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्याने संशोधकांनी बेडकांच्या त्वचेचे रंग मोजले. त्यात बेडूक पूर्णपणे पिवळे दिसून आले
हा रंगबदल आनुवंशिक नाही, तर तो पर्यावरणीय संकेतांमुळे घडतो. हा रंगबदल एपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन या ताण-हॉर्मोन्समुळे (stress hormones) होतो
नर बेडूक कुरकुरण्याच्या आवाजानेही मादींना आकर्षित करतात. जेव्हा अनेक नर एकत्र कुरकुरतात, तेव्हा तो आवाज मादींना दूरवरूनही ऐकू येतो, आणि त्या त्या दिशेने येतात
प्रजनन हंगामात अचानक सर्व जलाशय पिवळ्या नर बेडकांनी भरलेले दिसतात, तर माद्या तपकिरीच राहतात
पिवळ्या रंगाचे नर बेडूक मोठे किंवा बलवान असतीलच असे नाही, “हा रंग फक्त ‘मी नर आहे’ हा संकेत देतो
प्रजनन काळ संपल्यावर हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं, आणि नर मूळ तपकिरी रंगात परततो. हा रंग त्याला झाडीत लपून राहण्यास मदत करून भक्षकांपासून संरक्षण देतो
हा अल्पकालीन रंगबदल म्हणजे एक उत्क्रांतीशील युक्ती आहे, जोडीदार पटकन मिळवण्यासाठी विकसित झालेली एक नैसर्गिक रणनीती आहे