पुढारी वृत्तसेवा
पेअर्स (नाशपाती)मधील फायबरमुळे पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
नाशपाती खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार लागणारी भूक नियंत्रित होते.
यातील 'व्हिटॅमिन सी' शरीराची इम्युनिटी वाढवून तुम्हाला आजारांपासून दूर ठेवते.
नाशपातीतील अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून रक्षण करतात.
यातील पोटॅशियममुळे हृदयाचे ठोके आणि स्नायूंचे कार्य सुरळीत चालते.
नाशपातीमधील नॅचरल फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
भरपूर पाण्याचे प्रमाण असणारे हे फळ शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते.
यातील नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि एनर्जेटिक ठेवतात!