Vitamin Deficiency Symptoms शरीरात 'या' ८ गोष्टी घडतायत? असू शकते व्हिटॅमिनची कमतरता!

पुढारी वृत्तसेवा

गंभीर आजार उद्भवण्यापूर्वीच शरीर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असल्‍याची लक्षणे दाखवत असते.

सतत थकवा जाणवणे आणि उत्साह कमी असणे ही शरीरात लोह (Iron) किंवा व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचे दर्शवते.

नखे सहज तुटणे आणि केस दुभंगणे ही मुख्यत्वे बायोटिन (व्हिटॅमिन B7) कमी पडल्याची लक्षणे आहेत.

दात घासताना हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन C चे प्रमाण कमी असू शकते.

कापलेले किंवा खरचटलेले भाग बरे होण्यास जास्त वेळ लागत असल्यास शरीरात झिंकची (Zinc) कमतरता असू शकते.

हाता-पायांच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र गोळे (Cramps) येणे हे मॅग्नेशियम किंवा पोटॅशियमच्या अभावामुळे होते.

मंद प्रकाशात पाहताना त्रास होणे किंवा रातंधळेपणा जाणवणे हा व्हिटॅमिन A च्या कमतरतेचा संकेत आहे.

त्वचा खूप रखरखीत होणे हे आवश्यक फॅटी ॲसिड्स किंवा व्हिटॅमिन E कमी असल्याचे सांगते.

तोंडात सतत फोड येणे आणि ओठांच्या कोपऱ्यांना भेगा पडणे ही व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्सच्या अभावाची मुख्य लक्षणे आहेत.

यातील कोणतीही लक्षणे दिसल्यास आहाराकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य ती जीवनसत्त्वे सुरू करा.

येथे क्‍लिक करा.