पुढारी वृत्तसेवा
बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हे उंचीच्या तुलनेत वजनाचे प्रमाण मोजणारे एक साधन आहे.
वाढत्या वयाबरोबर वाढणार्या वजनाचा थेट आरोग्यावर परिणाम होतो, असे शेफिल्ड आणि नॉटिंगहम विद्यापीठात झालेल्या नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.
दोन्ही विद्यापीठांनी हे संशोधन २००५ ते २०२१ दरम्यान लठ्ठपणासंदर्भात आरोग्य सर्वेक्षणातील माहितीवरून केले.
या संशोधनात दोन्ही विद्यापीठांच्या संशोधकांनी वृद्धत्व, पर्यावरणीय घटक किंवा पिढीतील फरकांमुळे लठ्ठपणा होतो का, याचा शोध घेतला.
यात संशोधकांनी लठ्ठपणाचे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे माप बीएमआय, तसेच कंबर ते उंची गुणोत्तर यासह इतर संबंधित मोजमापांचे परीक्षण केले.
वाढत्या वयासोबत येणारा लठ्ठपणा मोजण्यासाठी 'बॉडी मास इंडेक्स' (BMI) पेक्षा 'कंबर आणि उंचीचे गुणोत्तर' हे अधिक अचूक साधन आहे.
'बीएमआय' हे वयाशी संबंधित लठ्ठपणाच्या जोखमीचे अधिक अचूक आणि विश्वासार्ह सूचक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
शेफिल्ड आणि नॉटिंगहम विद्यापीठाच्या डॉ. लॉरा ग्रे यांनी म्हटलं आहे, पोटाभोवती साठवलेली चरबीचा महत्त्वाच्या अवयवांवर आणि एकूण आरोग्यावर जास्त परिणाम होतो.
वाढत्या वयाबरोबर वाढणार्या शरीरावर वाढणारी चरबी नियंत्रणात ठेवणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे नवीन संशोधनात नमूद करण्यात आले आहे.