पुढारी वृत्तसेवा
मसूर हे गुणकारी द्विदल कडधान्य आहे. अगदी जुन्या काळापासून जगभरात याची लागवड केली जात आहे.
मसूरमध्ये दोन प्रकार आढळतात. आख्खा मसूर वरून काळा दिसला, तरी त्याची डाळ लाल म्हणजेच 'केशरी' रंगाची असते.
आयुर्वेदानुसार मसूर मधुर, शीतल आणि हलके असतात. हे शरीरातील कफ, पित्त आणि ताप दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
तुम्हाला वारंवार थकवा जाणवतो का? मसूर डाळीमध्ये लोहाचे (Iron) प्रमाण भरपूर असते, जे शरीराला ताकद देते आणि रक्ताची कमतरता भरून काढते.
खूप जुलाब किंवा अतिसाराचा त्रास होत असेल, त्यांच्यासाठी मसूरचे सेवन करणे गुणकारी ठरते.
स्रवणाऱ्या अर्शामध्ये (म्हणजेच रक्त पडणाऱ्या मूळव्याधाच्या त्रासात) मसूरच्या डाळीचा आहारात वापर करणे खूप फायदेशीर ठरते.
मसूर वातुळ असल्याने काहींना गॅसचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी मसूर खाताना सोबत तेलाचा वापर करणे हितकर ठरते.
मसूरमध्ये गंधकाचे प्रमाण नगण्य असल्याने ही डाळ तुलनेने पचायला हलकी मानली.
मसुराची टरफले काढून बनवलेले पीठ अत्यंत पौष्टिक असते. वाटाणा आणि सोयाबीनपेक्षाही यात 'अल्ब्युमिनॉइड्स' चे प्रमाण जास्त असते.
केवळ डाळच नाही, तर मसूरच्या पानांची भाजीही चवीला कडवट असली तरी पचनासाठी अतिशय हलकी आणि गुणकारी असते!