अविनाश सुतार
शेळीच्या दुधात व्हिटॅमिन B6, B12, C आणि D मुबलक असते. यात फोलेट बाइंडिंग घटकही असतात
शेळीच्या दुधामुळे फॉलिक अॅसिडचे प्रमाण वाढते. दुधातील प्रथिने जड नसतात, त्यामुळे ते पचण्यास सहज असतात
शेळीच्या दुधाचे सेवन केल्यास ब्लड काउंट वाढण्यास मदत होते. आणि शरीर निरोगी राहते
शेळीच्या दुधात सेलेनियम असते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करून आजारांपासून दूर ठेवते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते
शेळीच्या दुधातील कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, फास्फोरस, पोटॅशियम, आयर्न, कॉपरमुळे मेटॅबॉलिझम रेट चांगला राहण्यास मदत होते
शेळीच्या दुधातील चांगल्या फॅटी अॅसिडमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. पोटॅशियम अधिक असल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते
शेळीच्या दुधातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्ममुळे सूज आणि पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करते
शेळीच्या दुधात कॅल्शियम आणि अमिनो अॅसिड असल्याने या दुधामुळे दात आणि हाडे मजबूत होतात
डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरते