Bar Tailed Godwit | जगात सर्वाधिक लांब नॉन-स्टॉप उड्डाण करणारा पक्षी माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

जगातील सर्वांत लांब नॉन-स्टॉप उड्डाण करणारा दुर्मिळ स्थलांतरित पक्षी म्हणून ‘बार-टेल्ड गॉडविट’ला ओळखले जाते

सायबेरिया, अलास्का आणि टुंड्रा हे त्याचे मूळ निवासस्थान आहे. भारतात तो प्रामुख्याने मुंबई व कोकण किनारपट्टीवर दिसून येतो

लांब पाय, थोडी वर वळलेली चोच आणि शेपटावरील आडव्या पट्ट्यांमुळे या पक्षाला ओळखले जाते.

गॉडविट या पक्ष्याचे वजन 230 ते 450 ग्रॅम असते. पंखांची रुंदी 70 ते 80 सेंटीमीटर असते. प्रौढ गॉडविटची लांबी 37 ते 39 सेंटीमीटर दरम्यान असते

हा पक्षी समुद्री कीडे, जंत, शंख-शिंपले खातो आणि लांब चोचेच्या सहाय्याने गाळात खोलवर अन्न शोधतो

हा पक्षी अलास्का–न्यूझीलंड दरम्यान तब्बल ११ ते १२ हजार किमी अंतर ८ ते १० दिवस न थांबता पार करतो

‘बार-टेल्ड गॉडविट’ हवामानातील बदल वा स्थलांतर मार्गातील विचलनामुळे स्थलांतर करत असतो

वैज्ञानिकांच्या मते, उड्डाण घेताना हा पक्षी आपल्या शारीरिक अवयवांना आकसवतो, त्यामुळे त्याचे शरीर खूपच लहान होते. याची त्याला उड्डाणाच्या वेळी मदत होते

ही पक्षी प्रजाती साधारणपणे अलास्कामध्ये आढळते, पण स्थलांतरासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे मार्गक्रमण करत असतो

येथे क्लिक करा