Fennel Seeds Benefits: केवळ मुखशुद्धी नव्‍हे! बडीशेपमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! फायदे वाचून व्‍हाल थक्क!

पुढारी वृत्तसेवा

आयुर्वेदात बडीशेपला केवळ मुखशुद्धीसाठीच नाही, तर उत्तम औषध म्हणूनही मानाचे स्थान आहे.

आपल्या अप्रतिम मधुर स्वादामुळे आणि औषधी गुणांमुळे बडीशेपला संस्कृतमध्ये 'मधुरी' म्हटले जाते.

आचार्य चरक यांच्या मते, बडीशेप गर्भ टिकवून ठेवण्यास (गर्भस्थापन) आणि पोटदुखीवर (शूलप्रशमन) अत्यंत गुणकारी आहे.

आचार्य सुश्रुतांच्या मते, शरीरातील वाढलेला कफ कमी करण्यासाठी (कफसंशमन) बडीशेप रामबाण उपाय आहे.

युनानी वैद्य बडीशेपला पाचक मानतात; तसेच मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी ती प्रभावी ठरते.

उष्णता, तोंडाची अरुची आणि भूक न लागणे या समस्या बडीशेपच्या सरबताने दूर होण्‍यास मदत होते.

बाळांतिणीला बडीशेपचा काढा किंवा सरबत दिल्यास बाळाला उष्णतेचा त्रास होत नाही आणि अंगावरील दूध वाढते.

युनानी चिकित्सेनुसार बडीशेपची पाने 'चक्षुष्य' म्हणजेच डोळ्यांची दृष्टी सुधारणारी मानली गेली आहेत.

बडीशेप, ज्येष्ठमध, आवळा आणि खडीसाखरेचे मिश्रण पोट साफ ठेवण्यास आणि ॲसिडिटी घालवण्यास मदत करते!

येथे क्‍लिक करा.