पुढारी वृत्तसेवा
रात्री उशिरा खालेल्या चुकीच्या पदार्थांमुळे अॅसिडिटीसह वजन वाढीचा धोका असतो.
रात्री उशिरा जेवणास खूपच वेळ झाल्यास कोणते पदार्थ खावेत याबाबत आहारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घेवूया.
१ ग्लास कोमट दूध! शांत झोप मिळवण्यासाठी आणि प्रोटीन-कॅल्शियमसाठी सर्वोत्तम उपाय.
पचायला हलकी केळी! स्नायूंना मिळेल आराम आणि गोड खाण्याची इच्छाही होईल पूर्ण.
ओट्सचा छोटा बाऊल! फायबरने समृद्ध ओट्स रात्रीच्या भुकेवर ठेवतील दीर्घकाळ नियंत्रण.
मूठभर सुका मेवा! बदाम, अक्रोड आणि पिस्ता देतील हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन.
सफरचंद आणि पिनट बटर! फायबर आणि प्रोटीनचे हे उत्तम मिश्रण पोट ठेवेल तृप्त.
होल-ग्रेन टोस्ट! मैद्याच्या ब्रेडऐवजी पनीर किंवा हुमुससोबत खा निरोगी होल-ग्रेन ब्रेड.
लो-फॅट पनीर! रात्रीच्या वेळी जास्त कॅलरीज न वाढवता पोट भरण्याचा सोपा मार्ग.
एक उकडलेले अंडे! उच्च दर्जाच्या प्रोटीनचा डोससाठी बेस्ट पर्याय.
गोड मिठाईला म्हणा 'बाय'! रात्रीच्या वेळी आवडीनुसार ताजी आणि आरोग्यदायी फळे खा.
टीप: इंटरनेट स्रोतांवर आधारित ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.