मोनिका क्षीरसागर
थंडीच्या दिवसात रताळे खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
रताळ्यामध्ये 'व्हिटॅमिन ए' भरपूर प्रमाणात असल्याने ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
रताळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात.
यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी रताळ्यातील पोषक घटक अत्यंत गुणकारी ठरतात.
हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी आहारात रताळ्याचा समावेश नक्की करा...