पुढारी वृत्तसेवा
पचनशक्ती सुधारते
जेवल्यानंतर भाजलेले जवस खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
वजन नियंत्रणात राहते
जवसामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
हृदयविकाराचा धोका कमी
जवसातील 'ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स' रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य जपतात.
मधुमेहासाठी गुणकारी
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रोज थोडे भाजलेले जवस खाणे फायदेशीर ठरते.
बद्धकोष्ठापासून सुटका
फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठाची समस्या दूर होते.
त्वचा आणि केसांसाठी उत्तम
जवसातील पोषक घटकांमुळे त्वचा तजेलदार होते आणि केसांची वाढ चांगली होऊन ते मजबूत होतात.
हाडे मजबूत होतात
यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक असल्याने हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
नैसर्गिक डिटॉक्स
जवस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.